भंडाराविदर्भ

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल ग्रंथालयाचे उद्घाटन

डिजिटल क्रांतीकडे महत्त्वपूर्ण पाऊल; महसूल मंत्र्यांच्या हस्ते ई-लायब्ररी सुरू

भंडारा : राज्य शासनाच्या प्रशासनात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२) महसूल ग्रंथालयाचे (ई-लायब्ररी) उद्घाटन झाले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. या ई-लायब्ररीमुळे महसूल विभागाशी संबंधित सर्व महत्त्वाचे दस्तऐवज, नियमावली आणि कायदे आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटनप्रसंगी विधान परिषद सदस्य परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “ई-लायब्ररी ही केवळ एक डिजिटल सुविधा नसून, ती एक शाश्वत ज्ञानसंपत्ती आहे. यामुळे महसूल विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची गुणवत्ता वाढेल आणि प्रशासनाच्या गतिमानतेला चालना मिळेल. परिणामी, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध होतील.”

या ई-लायब्ररीमध्ये महसूल विषयक जुने आणि नवीन सर्व दस्तऐवजांचे वर्गवारी करून डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यात प्रशिक्षणासाठी उपयुक्त दस्तऐवज, विविध योजना आणि भू-संपत्तीबाबत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह सर्व महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती सहज, जलद आणि अचूक पद्धतीने उपलब्ध होईल.

या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाने केले होते. या उपक्रमामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button