गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्री सहायता निधीतून गडचिरोलीतील दोन रुग्णांना प्रत्येकी एक लाखाची मदत

रुग्णांना मिळाला आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीमुळे त्यांच्या उपचाराला मोठा आधार मिळाला आहे.

यामध्ये गडचिरोली येथील गोकुळनगरमधील रहिवासी किरण दिनेश कोहचाळे आणि कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील तथागत मोहन वैद्य यांचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण सध्या नागपूरमध्ये उपचार घेत आहेत. किरण कोहचाळे यांना हृदयरोगाच्या उपचारासाठी, तर तथागत वैद्य यांना मेंदूरोगाच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील इतर गरजू आणि पात्र रुग्णांनाही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत देऊन मोठा आधार देत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button