गोंदियाविदर्भ

ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘जन आरोग्य समिती’ सभा संपन्न

समितीच्यावतीने ‘एक पेड माँ के नाम‘ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण ; गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेवर भर

आमगाव : तालुक्यातील ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतीच जन आरोग्य समितीची सभा पार पडली. या सभेत आरोग्यसेवेतील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनवंत वट्टी आणि छबुताई उके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषद सदस्य हनवंत वट्टी आणि छबु उके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमकुमार बघेले यांनी प्रास्ताविक सादर केले. सभेमध्ये आरोग्य संस्थेतील विविध कामकाजावर चर्चा झाली. तसेच, आरोग्य केंद्राच्या भौतिक आणि आर्थिक गरजांबाबत नियोजन करण्यात आले. दोन्ही सदस्यांनी आरोग्य संस्थेच्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले.

सभेच्या समाप्तीनंतर, जन आरोग्य समितीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद सदस्य हनवंत वट्टी आणि छबुताई उके यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बारई, डॉ. भूमेश बिसेन, डॉ. मिलिंद मेश्राम यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, आशासेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी पर्यावरणासाठी योगदान देण्याचे आवाहनही केले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गौतम, सरपंच, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button