गडचिरोलीविदर्भ

चिमरीकल ते पदाबोरीया रस्त्याच्या बांधकामासाठी खासदारांना निवेदन

रस्ता नसल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांची मोठी गैरसोय

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील चिमरीकल, पावरवेल आणि पदाबोरीया या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी करत कामनगडचे सरपंच संजय गावडे यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निवेदन दिले आहे.

सद्यस्थितीत पावरवेल आणि पदाबोरीया या गावांना जोडण्यासाठी कोणताही योग्य रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यासह वर्षभर येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा आणि बाजारपेठेत जाण्यासाठी त्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे ही एक ज्वलंत समस्या बनली असून, रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पुरवणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पावरवेल ते पदाबोरीया या गावांना जोडणाऱ्या सुमारे ७ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम तातडीने करावे, अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या भागातील अनेक समस्यांपैकी ही समस्या प्राधान्याने सोडवण्याची मागणी संजय गावडे यांच्यासह जीतू पाटील मुनघाटे आणि नरेश खोबे यांनी केली आहे. खासदार डॉ. किरसान यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button