
गोंदिया : तालुक्यातील कटंगी गावातील अनेक युवकांनी युवानेते रोहित अग्रवाल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेश टेंभरे यांच्या नेतृत्वाखाली जनता की पार्टी (चाबी संघटना) मध्ये प्रवेश केला. युवा नेते रोहित अग्रवाल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेश टेंभरे यांनी सर्व युवकांचे स्वागत करून जनता की पार्टी या पक्षाचे मूळ मंत्रानुसार जनसेवेत तत्पर राहण्याचा संकल्प दिला.
ज्या दिवसापासून जनता की पार्टी (चाबी संघटना) च्या सदस्य नोंदणीची सुरुवात झाली, त्या दिवसापासून अनेक तरुणांनी जनता की पार्टी (चाबी संघटना) ला आपली पहिली पसंती मानून आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्याने प्रेरित होऊन जनता की पार्टी (चाबी संघटना) मध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये अमोल शेंडे, शुभम राऊत, अविनाश राऊत, भागेंद्र राऊत, देवेंद्र राऊत, छमेंद्र राऊत, राजू राऊत, रामचंद खोब्रागढे, रोहित कुर्वे, चंद्राश कावरे, शुशील राऊत, अतुल चोबरे, मंगल कावरे, समीर सोनवाने, डेविड राऊत, जित नेवारे, आशिष नागरिकर यांचा समावेश आहे.
प्रवेशावेळी जनता की पार्टी (चाबी संघटना) चे अध्यक्ष भाऊराव उके, युवानेता रोहित अग्रवाल, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेश टेंभरे, राजू कटरे, छगनलाल माने, बबलू डोनेकर आदींसह जनता की पार्टी (की संघटना) संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



