चंद्रपूरविदर्भ

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे एका २० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी उघडकीस घडली. ऋतिक शंकर हनवते (वय २०) असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ऋतिकचे आई-वडील आणि बहीण शेतमजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी कुणीही नसताना ऋतिकने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. बहीण घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने

रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. ऋतिकने यावर्षीच आयटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो शिक्षणासोबतच मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. भद्रावती पोलिस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button