गडचिरोलीविदर्भ

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी अहेरी येथे राखीव. रविवार, 13 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 06.00 वा. देवीचे विसर्जन उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. रात्री अहेरी निवासस्थान येथे मुक्काम.

सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वा. अहेरी येथून गोलाकर्जी- राजाराम खांडला मार्गे छल्लेवाडाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ते दुपारी 02.00 वा. छल्लेवाडा येथे आगमन व जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 वा. ते 03.00 वा. राखीव. दुपारी 03.00 वा. छल्लेवाडा येथून अहेरीकडे प्रयाण. सायं.04.30 वा. अहेरी निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायं. 05.00 वा. नवभारत-नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार कार्यक्रमास  वासवी सेलीब्रेशन हॉल, अहेरी येथे उपस्थिती. सोईनुसार राजवाडा अहेरी निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.00 वा. राजवाडा अहेरी निवासस्थान येथून प्राणहिता हेलिपॅड अहेरीकडे प्रयाण. सकाळी 09.15 वा. प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व भामरागडकडे प्रयाण. सकाळी 09.45 वा. भामरागड येथे आगमन व देवीचे दर्शनाकरीता प्रयाण. सकाळी 10.00 वा. देवीचे दर्शन. सकाळी 10.45 वा. भामरागड येथून अहेरीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. राजवाडा अहेरी निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 01.00 वा. ग्रामरोजगार सेवक संघटना गडचिरोली तर्फे जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमास वासवी सेलीब्रेशन हॉल, अहेरी येथे उपस्थिती.

बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी अहेरी निवासस्थान येथे राखीव. गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.30 वा. राजवाडा अहेरी निवासस्थान येथून सिरोंचाकडे  प्रयाण. सकाळी 11.30 वा. सिरोंचा निवासस्थान येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा. ते दुपारी 02.00 वा. सिरोंचा येथे जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 ते 03.00 राखीव. दुपारी 03.00 वा. हेलिपॅड सिरोंचा येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.30 वा. प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थान अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.45 वा. राजवाडा अहेरी निवासस्थान येथे आगमन, राखीव व मुक्काम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button