नागपूरविदर्भ

सुटी नाकारल्यामुळे मनपा कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पाचपावली पोलिसांत दोन जमादारांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याने सुटी नाकारल्यामुळे आणि कामाचा मानसिक त्रास दिल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी महानगरपालिकेच्या दोन जमादारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत राजू दुधीराम उपाध्ये (वय ५८) हे नागपूर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ३ ऑगस्ट २०२५ रोजी गटरचे झाकण पायावर पडून ते जखमी झाले. त्यांचा मुलगा सौरभ सुटीचा अर्ज घेऊन जमादार योगेश रमेश हातीपछेल (वय ४२) आणि गुड्डू विठोबा राऊत (वय ५०) यांच्याकडे गेला. मात्र, आरोपींनी सुटीचा अर्ज नामंजूर केला. सुटी मिळाली नाही तर गैरहजेरी लागून पगार कापला जाईल, या भीतीने राजू उपाध्ये कामावर गेले. पण तिथे आरोपींनी त्यांना जास्तीचे काम देऊन त्रास देणे सुरू केले. या मानसिक त्रासाला कंटाळून राजू उपाध्ये यांनी ६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमुळे प्रकरण उघडकीस

राजू उपाध्ये यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी देत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा सौरभ उपाध्ये याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १०८, ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button