गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

‘व्हिजन गडचिरोली २०२५’ चर्चासत्रात जिल्ह्याच्या विकासावर मंथन ; सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित

गडचिरोली: जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. २६) ‘व्हिजन गडचिरोली २०२५’ या खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या चर्चासत्रात जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर आणि युवा वर्गाने महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

चर्चासत्रात रोजगार, कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले आणि याच उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल तिडके, महेश काबरा आणि प्रा. मुनघाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवर, तज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपली मते, सूचना आणि अनुभव मांडले. या माध्यमातून गडचिरोलीच्या विकासाला एक ठोस दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या उपक्रमातून जिल्ह्याला समृद्ध आणि प्रगत करण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button