गोंदियाविदर्भ

गोंदिया रेल्वे स्थानकावर ‘दुर्घटना राहत चिकित्सा यान’ला आग

हावडा-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत; कोणतीही जीवितहानी नाही

गोंदिया: हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या ‘दुर्घटना राहत चिकित्सा यान’च्या एका डब्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

प्लॅटफॉर्म ३ वर थांबलेल्या ‘दुर्घटना राहत चिकित्सा यान’च्या डब्याला अचानक आग लागल्याचे निदर्शनास येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन यंत्रणा आणि साधनांचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर तात्पुरता ‘ब्लॉक’ (वाहतूक थांबवणे) घेण्यात आला. परिणामी, या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे ‘दुर्घटना राहत चिकित्सा यान’चा डबा आतून पूर्णपणे जळून खाक झाला आहे. रेल्वे प्रशासन या घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button