
१३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड
गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. जिल्हा प्रेक्षागार मैदानात झालेल्या या स्पर्धेत गडचिरोली तालुक्यातील एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी गडचिरोली तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. युगांत गणेश येलमुले, विनायक तिरुपती गावे, शब्द निशांत करकवार, ऋषीकेश दिवाकर बोरकर, चंदन देवेंदर काटेला, वैभव बंडू कुळमेथे, वैभव मुरलीधर धवस, वत्सल वनपाल सोयाम, सुराज राजेंद्र कुळमेथे, आदित्य तिरुपती गादे, आदित्य राजबापू ताटी, वेदांत संदीप चाफले आणि यशित राहुल देव्हारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



