गोंदियाविदर्भ

पोत्यात सडलेले मानवी अवशेष आढळल्याने खळबळ

दशरथटोला (ब्राह्मणी) येथील घटना ; पोलिसांकडून तपास सुरू

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (ब्राह्मणी) येथे एका पोत्यात सडलेले मानवी अवशेष आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून, याबाबत सालेकसा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दशरथटोला गावातील देवेंद्र लक्ष्मण नागपुरे (वय ३३) हे परत येत असताना त्यांना एका दुकानाजवळ दुर्गंधी आली. त्यांनी पाहिले असता रस्त्याच्या कडेला एक पोते दिसले. ते उघडल्यावर आत मानवी कवटी आणि शरीराचे सडलेले अवशेष आढळले. हे पोते कुत्र्यांनी ओढून आणले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह कोणाचा आहे आणि मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर मावस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button