गडचिरोलीविदर्भ

निवृत्तीनंतरही नायब तहसीलदार ‘हमीद’ जनसेवेत कार्यतत्पर

बत्तीस वर्षांच्या प्रशासकीय अनुभवानंतर सिरोंचात सुरू केले स्वतःचे कार्यालय ; संतोष ताटीकोंडावार यांनी दिल्या़ शुभेच्छा 

सिरोंचा: सिरोंचा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले सय्यद हमीद सत्तार ३० जून २०२५ रोजी ३२ वर्षे २ महिन्यांच्या यशस्वी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. परंतु, निवृत्तीनंतरही त्यांनी जनसेवेचा संकल्प कायम ठेवला आहे. ‘हमीद भैय्या’ या नावाने सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले हमीद यांनी नागरिकांना शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःचे कार्यालय सुरू केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे कौतूक करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या़.

सय्यद हमीद सत्तार यांनी 3 मे 1993 रोजी भामरागड तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर शासकीय सेवेत रुजू झाले़. 1996 पर्यंत भामरागड येथे सेवा बजावल्यानंतर त्यांची गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली. त्यानंतर जून 2000 साली ते सिरोंचा तहसील कार्यालयात रुजू झाले. 2012 पर्यंत सिरोंचात असतानाच त्यांना अवल कारकून पदावर पदोन्नती मिळाली. 2012 ते 2017 पर्यंत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच त्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती मिळाली. दरम्यान 2020 ते 2021 जूनपर्यंत त्यांनी सिरोंचा तहसीलदार पदावरही कार्य केले. त्यानंतर अहेरी येथे त्यांची बदली झाली. या काळात त्यांनी अहेरी आणि एटापल्ली या दोन्ही ठिकाणी तहसीलदार पदाची जबाबदारी सांभाळली. जुलै 2024 ला सिरोंचा येथे स्थानांतरण झालेले हमीद भाई यांनी सिरोंचा नायब तहसीलदार पदासह नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

सामान्य जनतेशी आपुलकीच्या भावनेने भेटणारे, कुठल्याही कामासाठी सकारात्मक भावनेने प्रतिसाद देणारे अधिकारी म्हणून हमीद भाई यांची ओळख होती. अहेरी, सिरोंचा, एटापल्ली याठिकाणी त्यांनी चांगला जनसंपर्क ठेवित लोकांमध्ये लोकाभिमुख कार्य करणारे अधिकारी अशी ओळख निर्माण केली. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी नागरिकांना शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःचे कार्यालय सुरू केले आहे.

हमीद यांच्या या अनोख्या संकल्पनेचे कौतुक करताना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी त्यांचा सत्कार केला. “३२ वर्षे दोन महिन्याच्या शासकीय सेवेतील कालावधीनंतर निवृत्त होत असताना प्रशासनातील कार्याच्या अनुभवाचा तालुक्यातील जनतेसाठी नक्कीच ते वापर करतील. हमीद भैय्या प्रशासनातून बाहेर पडलेले एक नवीन सामाजिक कार्यकर्ते म्हणून सिरोंचावासियांना दिसतील,” अशी अपेक्षा ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हमीद यांच्या अनुभवाचा जनतेला नक्कीच फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button