गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यात उत्कृष्ट कार्यासाठी चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघास प्रथम बक्षीस

लाखोंचे कर्ज फेडून ५६ लाख नफ्यात गेलेल्या संस्थेचे विदर्भ स्तरावर कौतुक

गडचिरोली : दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, नागपूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट कार्यासाठी चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, चामोर्शी या संस्थेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

एकेकाळी लाखोंच्या कर्जात बुडालेल्या चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली, तसेच संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने मोठी भरारी घेतली आहे. या संस्थेने केवळ कर्जमुक्तीच मिळवली नाही, तर आता शासनाकडून संस्थेला कोट्यवधी रुपये येणे बाकी आहेत. या वर्षी संस्थेने ५६ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. संस्था सलग १५ वर्षांपासून उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळवत आहे.

नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री सुनील केदार आणि मॅनेजिंग डायरेक्टर हरीभाऊ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

हा पुरस्कार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अतुल गण्यारपवार, व्यवस्थापक नरेश घेर आणि दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, गडचिरोलीचे व्यवस्थापक मामिडवार यांनी स्वीकारला. चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button