
केसलाघाट जवळील घटना
मूल : महादवाडीवरून मुलाला घेऊन दुचाकीने जात असताना मुख्य मार्ग ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दबा धरून असलेल्या वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. तर पतीला व मुलाला किरकोळ जखम झाली. ही घटना मूल-चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट जवळील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन क्षेत्र कक्ष क्रमांक ३५५ जवळ शनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली.
विकास जानकीराम कुळमेथे (२७) व एक वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी आहे तर पत्नी अंजनी विकास कुळमेथे (२६) गंभीर जखमी आहे. मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला महादवाडी येथून मूल येथे उपचारार्थ दवाखान्यात दुचाकीने पती-पत्नी घेऊन जात होते. केसलाघाटजवळ दोन दरम्यान, पट्टेदार वाघ रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दबा धरून होते. दुचाकी जवळ येताच एका वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नीला गंभीर दुखापत झाली. संतोष रावत यांनी स्वतःच्या गाडीत बसवून तिघांनाही रुग्णालयात भरती केले.



