
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात बिस्किट आणि फळ वितरण कार्यक्रम
सिरोंचा: अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे रुग्णांना फळ आणि बिस्किटांचे वितरण करण्यात आले.
रुग्णांना फळ व बिस्किट वितरण कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आले. याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर कुलुरी, नगरपंचायत सिरोंचाचे उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक राजेश बंदेला, जगदीश रालाबंडी, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवी सुलतान, नागेश दुग्याला, रंगू बापू, प्रणित मार्गोनी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



