गोंदियाविदर्भ

भरधाव टिप्परच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

मुंडीपार ते मुरदोली दरम्यानची घटना

गोरेगाव : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार ते मुरदोली दरम्यान टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दिनेश पंधरे (३२) व देवेंद्र उईके (३५, रा. बाघाटोला, जि. बालाघाट) अशी मृतांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनेश व देवेंद्र हे नागपूर येथे रोजगारासाठी राहत होते. दिवाळी निमित्त रविवारी पहाटे ते दुचाकी क्रमांक एमपी ५०-झेडसी ६७९४ ने स्वगावी जाण्यासाठी निघाले असता सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नागपूरहून गोंदियाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४०-बीएल ७८७३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की या धडकेत दिनेश व देवेंद्र जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button