गडचिरोलीविदर्भ

सफाई कामगारांसोबत आ. डॉ. मिलिंद नरोटे यांचा स्नेहसंवाद

स्नेह मिलन कार्यक्रमात समस्या जाणून घेत केला सन्मान  

गडचिरोली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद, गडचिरोली येथील सफाई कामगारांसाठी एका विशेष ‘स्नेह मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले. कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. नरोटे यांनी सफाई कामगारांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या.

आ. डॉ. नरोटे यांनी शहराच्या स्वच्छतेतील सफाई कामगारांचे अमूल्य योगदान अधोरेखित करत त्यांना ‘शहराचे स्वच्छता शिल्पकार’ म्हणून गौरवले. “तुमच्या परिश्रमामुळेच गडचिरोली शहर स्वच्छ आणि सुंदर राहते. सफाई कामगार हे आपल्या शहराचा पाया आहेत आणि त्यांच्या कामामुळेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते,” असे आमदार डॉ. नरोटे म्हणाले. या स्नेहमिलन कार्यक्रमात आमदार डॉ. नरोटे यांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

आ. डॉ. नरोटे यांनी यावेळी बोलताना, सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना चांगले जीवनमान देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button