गडचिरोलीविदर्भ

पुन्हा दारूविक्री केल्यास कारवाई ; पोलिस विभागातर्फे दारूविक्रेत्यांना इशारा  

गडचिरोली : विक्रमपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जयनगर व विक्रमपूर या दोन्ही गावांची संयुक्त सभा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही गावातील दारू विक्रेत्यांना बोलावून शेवटची समज देत पुन्हा अवैध व्यवसाय केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

जयनगर व विक्रमपूर या दोन्ही गावांमध्ये अवैधरित्या दारूविक्री सुरु असल्याने महिलांसह ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांनी एकी दाखवत दारूविक्री बंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. दारूविक्रेत्यांची दारू नष्ट करून धडा शिकविण्यात आला. त्यामुळे दारूविक्री बंदी करण्यात यश आले. परंतु, महिनाभरानंतर पुन्हा मुजोर विक्रेत्यांनी डोके वर काढत चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केला. दारूमुळे अपघात होऊन काही जणांचा जीव सुद्धा गेला आहे. आपल्या गावात दारूविक्री नको, असे मत व्यक्त करीत ग्रामस्थांनी चामोर्शी पोलिस व मुक्तिपथ टीमच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित केली. या सभेत दारूविक्रीमुळे गावात निर्माण होणाऱ्या समस्या मांडत अवैध दारू तत्काळ बंद  करण्याची मागणी केली. सभेत दोन्ही गावातील दारूविक्रेत्यांना बोलावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विक्रेत्यांना पोलिस विभागातर्फे देण्यात आला.

पोलिस निरीक्षक दीपक डोब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सभेत पोलिस उपनिरीक्षक, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, ओनिमा उत्तम सरकार, उषा बर, पौर्णिमा मंडळ, प्रकाश मंडळ, निरोपदो गाईन, नारायण मंडळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button