गडचिरोलीविदर्भ

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शन ; अश्विनी नैताम यांनी दाखल केले नामांकन

तेली वॉर्डपासून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

गडचिरोली : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे शहरात भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या मोठ्या जनसमर्थनाच्या जोरावर नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नैताम यांनी, पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह, मोठ्या जल्लोषात आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.

शहरातील तेली वॉर्ड पासून निघालेल्या या भव्य रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात, जोरदार घोषणाबाजी आणि मोठ्या जनसमर्थनासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकीत पक्षाकडे जनतेचा कल स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नगराध्यक्ष उमेदवार अश्विनी नैताम यांच्या नेतृत्वात, शहर विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button