गडचिरोलीविदर्भ

गट साधन केंद्र, एटापल्लीला ‘ISO मानांकन प्रमाणपत्र’ प्रदान

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार ; कार्यालयाच्या कामकाजावर व्यक्त केले समाधान

गडचिरोली: गट साधन केंद्र एटापल्लीच्या कार्यक्षम आणि उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत, १७ नोव्हेंबर रोजी या केंद्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी हृषीकेश बुरडकर आणि गट साधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांना हे मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी गट साधन केंद्राची पाहणी केली आणि कार्यालयाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच, कार्यालयाच्या पुढील प्रभावी कार्यासाठी आवश्यक संसाधनांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या भेटीदरम्यान सुहास गाडे यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमर राऊत, सहा. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (योजना) वैभव बारेकर,  सहा. कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा हुकरे उपस्थित होते

यावेळी केंद्रप्रमुख अरुणा बर्लावार, गट समन्वयक कोवे आणि गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button