चंद्रपूरविदर्भ

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायत येथे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ ते ३ डिसेंबर या तीन दिवसांदरम्यान मद्य, बिअर आणि ताडी विक्री संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जारी केले आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने मुक्त, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात होणार आहे

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा, घुग्घुस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या नगरपरिषदेत तर भिसी येथील नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजे १ डिसेंबर, मतदानाचा दिवस २ आणि, तसेच मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button