गोंदियाविदर्भ

विहिरीत आढळला अर्भकाचा मृतदेह

गंगाझरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा ; परिसरात खळबळ

गोंदिया : तालुक्यातील एकोडी येथील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घरच्या विहिरीत मृत अर्भक आढळल्याची घटना शनिवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार एकोडी येथील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घराच्या आवारात विहीर आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे कुटुंबीय विहिरीचे पाणी भरण्यासाठी शनिवारी सकाळी गेले असता त्यात मृत अर्भक तरंगताना आढळला. ठाकरे यांनी याची माहिती लगेच गावकरी आणि गंगाझरी पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक सुधीर वर्मा पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तसेच गोंदिया येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात अर्भक हे १ दिवसाचे असल्याचे व मृत्यू झाल्यावरच विहिरीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अर्भक मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्भक विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान याप्रकरणी या गावातील एका संशयित कुटुंबाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यातील नेमके सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button