
तिरोडा पोलिसांची कारवाई ; चार जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया : तिरोडा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दोन टिप्परमधून अवैध १४ ब्रास रेती जप्त केली. रेती वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परताना नव्हता. त्यामुळे १९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घोगरा ते एलोरा जाणारा रोडवर आरोपींचा ट्रक पकडण्यात आला.
या प्रकरणात टिप्पर (क्रमांक एमएच ४०, सीझेड- १८१९) चालक रोशन शंकपाल वनवे (२६, रा. खैरी, ता. तिरोडा, जि. गोंदिया), टिप्पर मालक राकेश भेलावे (२६, रा. घोगरा, ता. तिरोडा) व टिप्पर (क्रमांक एमएच- ४०, सीवाय-१८१९) चालक रोहित राजकुमार बांडेबुचे (२३, रा. मोहाडी, जि. भंडारा), टिप्पर मालक विनोद सोनटक्के (३०, रा. खापा, ता. तुमसर, जि. भंडारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत प्रत्येकी ७ ब्रास रेती एकूण १४ ब्रास प्रतिब्रास ६ हजार रुपये किंमत असा एकूण ८४ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. टिप्परची किंमत प्रत्येकी २० लाख असा एकूण ४० लाख ४८ हजार रुपये किमतीचा माल वाहतूक करताना पकडण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दडस पाटील करीत आहेत.



