गोंदियाविदर्भ

गोंदिया जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल : काँग्रेसचा तीन ठिकाणी ‘हात’ तर तिरोड्यात भाजपचे ‘कमळ’ फुलले!

गोंदिया नगरपरिषद अध्यक्षपदी सचिन शेंडे यांचा दणदणीत विजय ; नवनिर्वाचित सदस्यांची यादी जाहीर

गोंदिया : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत गोंदिया, सालेकसा आणि गोरेगाव या तीन महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेसने वर्चस्व राखले असून तिरोडा नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. जिल्हा प्रशासनाने विविध केंद्रांवर अधिकृतरीत्या निकाल जाहीर केले.

गोंदिया येथील निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे नगरपरिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी सचिन गोविंदराव शेंडे (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-27,898) यांची निवड झाल्याचे सांगितले. तिरोडा येथील नगर परिषदेचा निकाल तहसिलदार नारायण ठाकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तिरोडा येथे नगर परिषदेचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी अशोक रामजीबापू असाटी (भारतीय जनता पार्टी) (सर्वाधिक मते-8737) यांची निवड झाल्याचे सांगितले.  सालेकसा येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार अनिरुध्द कांबळे यांनी तहसिल कार्यालय सालेकसा येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यामध्ये नगराध्यक्षपदी विजय सुदाम फुंडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (सर्वाधिक मते-2769) यांची निवड झाल्याचे सांगितले. गोरेगाव येथील नगर पंचायतीचा निकाल तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र गोरेगाव येथे नगर पंचायतीचा निकाल जाहीर केला. यावेळी नगराध्यक्षपदी तेजराम मुन्सी बिसेन (इंडियन नॅशनल काँग्रेस) (सर्वाधिक मते-2638) यांची निवड झाल्याचे सांगितले.

नगरपरिषद गोंदिया: विजयी सदस्यांची प्रभागनिहाय यादी 

प्रभाग १: अमर केवलदास रंगारी, ज्योती राजु फुंडे, प्रभाग २: चंद्रकुमार आत्माराम चुटे, राय नीती विनोद, प्रभाग ३: संगीता सुनील देशमुख, यादव कैलाश राजाराम, प्रभाग ४: बिसेन मेथूला वारलुजी, शुक्ला राज मनोज, प्रभाग ५: शिशिर उदय बिसेन, अग्रवाल सीमा धर्मेश, प्रभाग ६: अजय लक्ष्मणसिंग यादव, ॲड. सरिता शिवराम मेश्राम, प्रभाग ७: बनसोड कल्पना ओमकार, शर्मा शिवकुमार शंकरलाल, प्रभाग ८: गडपायले स्नेहा उत्तमदास, भरने सुनील रघुनाथ, प्रभाग ९: शहारे दीपा सुनिल, यादव पंकज सुंदरलाल, प्रभाग १०: भालेराव सुनिल देवाजी, यादव संध्या उत्तम, प्रभाग ११: यादव नेहा विजयकुमार, अग्रवाल अभय कुंजबिहारीलाल, प्रभाग १२: रुपेश नशिने, संगीता अशोक गुप्ता, प्रभाग १३: देशमुख चंद्रकला सतीश, माने प्रदिप भिमराव, प्रभाग १४: मेश्राम अनिता सतीश, मिश्रा विवेक दिनेश, प्रभाग १५: कवास सीमाताई हेमंत, पटले संतोष मधुकर, प्रभाग १६: रुसे दिपिका देवेंद्र, बन्सोड बेबीनंदा योगेश, प्रभाग १७: जायस्वाल अनुजकुमार, दुर्गा सुनिल तिवारी, प्रभाग १८: नायक नेहा दिनेश, ठाकुर राकेशसिंग, प्रभाग १९: जयस्वाल क्रांतीकुमार, ठाकुर शीलू राकेशसिंग, प्रभाग २०: गहरवार प्रगती गोपालसिंह, राजीव मनोहर आसवानी, प्रभाग २१: वालदे प्रिती राहुल, मिश्रा निर्मला दिलीपकुमार, प्रभाग २२: रगडे विजय गणपत, सोनपुरे शिखा शिवपाल

नगरपरिषद तिरोडा: भाजपचे वर्चस्व

विजयी सदस्य: राजेश गुनेरिया, मनिषा येरपुडे, विजय बन्सोड, कुमूद मेश्राम, आशा भोंडेकर, कादर युसूफ मंसूरी, प्रभू असाटी, ममता धामेचा, सुनील पालांदूरकर, नम्रता भुते, रश्मी बुराडे, देवेंद्र तिवारी, छाया कटरे, अनिकेत कटरे, लताबाई पुडके, ममता बैस, मंगला तिरपुडे, परमानंद पारधी, रवी येरके, उर्मिला तिवडे.

नगरपंचायत सालेकसा व गोरेगाव : काँग्रेसची सरशी

सालेकसा: तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी निकाल जाहीर केला. विजयी उमेदवारांमध्ये सुनीता उईके, विनोद मडावी, रामबत्ती पुसाम, अतुल रेड्डीवार, पल्लवी शिवणकर, संदीप डेकाटे, प्रेरणा बंडीवार, सतीश करवाडे, योगिता असाटी, कुंदन बहेकार, प्रतिभा शिवणकर, अजयकुमार डोये, अनिता चुटे, छन्नू शिवणकर, रितेशकुमार लिल्हारे, ईठाबाई राऊत आणि किशोर गावराने यांचा समावेश आहे.

गोरेगाव: तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी निकाल जाहीर केला. पवनकुमार रहांगडाले, रघुपती अगळे, तिमेश्वरी पटले, राहुल येल्ले, बिरन बळगते, सुधीर येळे, सुषमा अगडे, शिला धानगावे, मलेशाम येरोला, शारदा सांगोडे, रंजना बारेवार, शामली जायस्वाल, राहुल चंद्रिकापुरे, आशिष बारेवार, साहेबलाल भैरम, गीता वंजारी आणि योगिता टेंभरे हे विजयी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button