गडचिरोलीविदर्भ

कोटगुल येथे पोलीस विभाग व मुक्तिपथच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती रॅली

विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमले कोटगुल ; दारू विक्रेत्यांना दिला इशारा

गडचिरोली : व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी आणि तरुण पिढीला घातक व्यसनांपासून वाचवण्यासाठी कोरची तालुक्यातील कोटगुल येथे पोलीस विभाग आणि मुक्तिपथ चमू यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये स्थानिक शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस प्रशासनाने हिरीरीने सहभाग नोंदवून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

रॅलीमध्ये टिपागड विद्यालय, शासकीय आश्रम शाळा आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगुल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातामध्ये व्यसनमुक्तीचे फलक (पोस्टर्स) धरून आणि घोषणाबाजी करत संपूर्ण गाव परिसर पिंजून काढला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी दारू विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना दारूबंदी संदर्भात कडक सूचनाही दिल्या. रॅलीचा समारोप पोलीस स्टेशनमध्ये झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक साळुंखे  आणि पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी मुलांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, व्यसनाचे दुष्परिणाम आणि कायदेशीर तरतुदींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला पोलीस विभागातील पोलिस कर्मचारी बाबुराव कवडो, अनिल मडावी, सविराज कोरेटी, अनिल  ढोरे, मनिषा सिडाम, वैशाली धुर्वा, मुक्तिपथचे युवनाथ मेश्राम, प्रेरक अरुणा गोन्नाडे, स्पार्क कार्यकर्ता धर्मेंद्र कुसराम आणि गावच्या सरपंच कुंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅली यशस्वी करण्यासाठी टिपागड विद्यालयाचे मुख्याध्यापक संहारे, शिक्षक एस. के. बावणे, आर. बी. कांबळे, एस. एम. बसोने, कु. पी. बी. मोहुर्ले, जि. प. शाळा कोटगुल येथील शिक्षक मडावी, मेश्राम, हुपुंडी तसेच शासकीय आश्रम शाळा येथील  मुख्याध्यापक कुरसंगे, शिक्षक करंजामी, कोरचा, देवदास पदा, कुलसंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button