
सिरोंचा : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, सिरोंचाच्या वतीने आयोजित धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव सुंकरी राजन्ना यांनी आमदारांना खरेदी प्रक्रियेतील गंभीर अडचणी सांगितल्या. खरेदी केलेल्या धानाची उचल मार्केटिंग महामंडळाकडून वेळेवर होत नाही, त्यामुळे मोठी घट सोसावी लागते. तसेच गोदामात वीज पुरवठा नसल्याने बोअरवेल असूनही पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही, ही अडचण ऐकताच आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कंत्राटदाराशी संपर्क साधून सोय करून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, जिल्हा कार्याध्यक्ष बानया जनगाम, नगरसेवक सतीश भोगे, माजी उपसभापती कृष्णमूर्ती रिककूला, ज्येष्ठ नेते चंद्रय्या रालबंडीवार, महिला जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, नागभूषणम चकिनारपुवार, ओमप्रकाश ताटीकोंडावारसह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटचे) पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



