गोंदियाविदर्भ

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमगाव आणि पुराडा येथे भेट देऊन घेणार आढावा

गोंदिया : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे शुक्रवार, १६ जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध मान्यवरांच्या भेटी घेणार असून त्यांचा जिल्ह्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.

सकाळी ८.३० वाजता: भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी १०.०० वाजता: गोंदिया येथे आगमन व काही काळ राखीव वेळ. दुपारी १.०० वाजता: गोंदिया येथून आमगावकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता: आमगाव येथे आगमन व स्वर्गीय महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी २.०० वाजता: आमगाव येथून देवरी तालुक्यातील पुराडाकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता: पुराडा येथे आगमन व आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी ३.०० वाजता: पुराडा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित उपविभागातील पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button