क्राईमगोंदियाविदर्भ

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, अर्जुनी मोरगाव पोलिसांनी येरंडीदेवी ते बाक्टी मार्गावर धाडसी कारवाई केली आहे. विनापास परवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी झडप घालून एकूण १० लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १६ जानेवारी रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, येरंडीदेवी ते बाक्टी या मार्गावरून अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता दोन ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या येताना दिसले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना किंवा पास आढळून आला नाही. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक MH-34 AP-1870, ट्रॅक्टर क्रमांक MH-36 AG-3447 असा एकूण १० लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी दीपक अशोक चांदेवार आणि निखील अशोक उपरीकर (दोन्ही रा. सासरा, ता. साकोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई चरणदास सावरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करीत असून अशा प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button