
गोंदिया : राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक हे 20 जानेवारी रोजी जिल्ह्याचे दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रविभवन, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हा नियोजन विकास समितीच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील व सोईनुसार गोंदिया येथून मोटारीने पुसद, जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.



