क्रीडागडचिरोलीविदर्भ

शिवनेरी वॉरियर्स संघाने जिंकली अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धा

रोमांचक अंतिम सामन्यात सिंहगड लायन्सचा पराभव, सिझन–8 यशस्वीरित्या संपन्न

गडचिरोली : शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळील स्व.ना. सा. गंगूवार मैदानावर अप्पर-डिप्पर ग्रुपतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धा सिझन–8 मध्ये शिवनेरी वॉरियर्स संघाने अंतिम षटकात षटकार लगावत ऐतिहासिक विजय मिळवला. रविवार, 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात शिवनेरी वॉरियर्सने सिंहगड लायन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले, तर सिंहगड लायन्सला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.

24 जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा सलग आठ दिवस चालली. या स्पर्धेत शिवनेरी वॉरियर्स, सिंहगड लायन्स, रायगड रॉयल्स व प्रतापगड पँथर्स अशा चार संघांनी सहभाग घेतला होता. लीग सामन्यांत पिछाडीवर असलेली शिवनेरी वॉरियर्स संघ केवळ प्रतापगड पँथर्सला हरवून उपांत्य फेरीत पोहोचली. त्यानंतर रायगड रॉयल्सवर मात करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सिंहगड लायन्सने लीग टप्प्यातच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

अंतिम सामन्यात शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उज्जैर शेख यांनी मारलेला षटकार निर्णायक ठरला आणि शिवनेरी वॉरियर्स संघाला विजेतेपद मिळवून दिले.

या स्पर्धेचा समारोप बोदली येथील समशेर खान पठाण यांच्या एनएस सेलेब्रेशन सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमनानी, माजी नगर सेवक प्रमोद पिपरे,काँग्रेसचे जेष्ठ नेते समशेर पठाण, सर्जन डॉ. यशवंत दुर्गे, अनुराग पिपरे, निखिल मंडलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंना ट्रॉफी व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. या यशस्वी आयोजनासाठी अप्पर-डिप्पर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button