गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना सांगितले की, “शिवाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत परकीय मुघल साम्राज्य तसेच युरोपीय वसाहतवादी शक्तींशी संघर्ष करून शिस्तबद्ध लष्कर, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा आणि उच्च नैतिक मूल्यांच्या बळावर सामर्थ्यशाली स्वराज्याची उभारणी केली.” शासकीय परिपत्रकानुसार प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली असून विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर मने यांनी केले, तर आभारप्रदर्शन अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. विकास चित्ते यांनी केले. याप्रसंगी मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, न. न. व. सा. संचालक डॉ. मनीष उत्तरवार, गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. धनराज पाटील, सिनेट सदस्य डॉ. नरेश मडावी तसेच सिनेट सदस्य व अध्यासन केंद्राचे प्रस्तावक सतिश पडोळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, महादेव वासेकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button