क्रीडागडचिरोलीविदर्भ

कोटगुलच्या मैदानावर आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा क्रीडा संग्राम

४१ आश्रमशाळा व २१ वसतीगृहांचा सहभाग ; तीनशे कर्मचारी दाखविणार कौशल्य

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, शासकीय वसतीगृह, प्रकल्प कार्यालयासह जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलन कोरची तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोटगुलच्या मैदानावर २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित केले आहे. या क्रीडा संग्रामात गडचिरोली प्रकल्पातील सुमारे तीनशे कर्मचारी क्रीडा कौशल्य व नैपुण्यता दाखविणार आहेत.

क्रीडा संमेलनाचे उद्घाटन  शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. राहणार आहेत. उद्घाटक म्हणून कोटगुल ग्रामपंचायत सरपंच मंजुषाताई कुमरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून कोटगुल येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहनसिंग मडावी, उपाध्यक्ष ग्यानसिंग नैताम, पोलीस पाटील भागवत कोल्हे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप कोवाची, पंचायत समिती कोरचीचे माजी सभापती श्रावण मातलाम, परमेश्वर लोहंबरे, राजेश नैताम, मुकेश नरोटे, मीराबाई दूधकवर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, नरेंद्र कावळे, कार्यालय अधीक्षक वासुदेव उसेंडी, पीएसआय कृष्णा सोळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल चोरुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा नेहमीच होतात. आता पहिल्यांदाच आयोजित केलेल्या गडचिरोली प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर  १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील कर्मचारी, २१ शासकीय वसतीगृह, प्रकल्प कार्यालयासह जात पडताळणी कार्यालयातील सुमारे तीनशे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, गोळाफेक, भालाफेक, धावणे या खेळाचे आयोजन केलेले आहे. खेळण्यासाठी कर्मचारी उत्साहित आहेत. पारितोषिक वितरण १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, नरेंद्र कावळे, लेखाधिकारी राजेश कोत्तावार, विभागीय क्रीडा उपसमन्वयक नेताजी गावड, मुख्याध्यापक एस.एम. कुळसंगे, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, क्रीडा मार्गदर्शक आशिष नंदनवार, अधीक्षक पी.एन. पडवे,अधीक्षिका एस. सी. चवरे आदींसह सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button