गडचिरोलीविदर्भ

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सिरोंचा पं.स.ची वार्षिक आमसभा

शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा

सिरोंचा : पंचायत समिती सिरोंचा यांच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रीडा संकुलाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी भूषविले.

या वार्षिक आमसभेत पंचायत समितीच्या वार्षिक कामकाजाचे सविस्तर विवरण सादर करण्यात आले. सिरोंचा तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामविकास तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. सभेदरम्यान उपस्थित नागरिकांच्या समस्या, मागण्या आणि सूचना प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या समोर मांडण्यात आल्या आणि त्यावर चर्चा झाली. यावेळी आमदारांनी नागरिकांच्या सूचनांची नोंद घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले.

या आमसभेला सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, तहसीलदार निलेश होनमोरे, गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे, पोलीस निरीक्षक निखिल फटिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके, तालुका कृषी अधिकारी विकास, गटशिक्षणाधिकारी दोंतुलवार, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, उपसभापती रिकाकूला कृष्णमूर्ती, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार यांच्यासह पंचायत समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button