गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासपल्ली येथील शेतकऱ्यांची घेतली भेट

वादळी पावसामुळे झालेल्या मका पिकाच्या नुकसानीची केली पाहणी

चामोर्शी : तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या व्यस्ततेमुळे तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करणे पूर्ण ठिकाणी शक्य झाले नव्हते. त्यामुळे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी २७ मार्च रोजी विकासपल्ली येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या दौऱ्यात शेतकऱ्यांनी शेतीविषयक अडचणी तसेच सामाजिक समस्या मांडल्या. या संदर्भात आवश्यक पावले उचलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवा हीच आमची प्राथमिकता आहे, असे आम. डॉ. नरोटे म्हणाले.

यावेळी सरपंच शामल सिकदार, उपसरपंच मिहिर विश्वास, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वीरेंद्रनाथ विश्वास यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button