गडचिरोलीविदर्भ

‘अंत्योदय’ संकल्पनेची आलापल्लीत प्रभावी अंमलबजावणी; अन्नधान्य किट वाटपातून गरजवंतांना दिलासा

आलापल्ली : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्याच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत आलापल्ली येथे गरजवंत नागरिकांसाठी अन्नधान्य किट वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले.

भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदयाच्या विचारातून प्रेरित होऊन आलापल्ली येथील उपसरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार यांनी दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे. यंदाही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

एटापल्ली व अहेरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गानिमित्त परिसरात आगमन झालेल्या डॉ. नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अनेक गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे यश ठरले. समाजातील वंचित, शोषित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून साकार होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

कार्यक्रमाला मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, युवा नेते सागर डेकाटे, सुकमल हलदार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अंत्योदयाच्या विचारांची अंमलबजावणी करत समाजसेवेची ही परंपरा भविष्यातही अखंड सुरू राहावी, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button