
भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग मतदारांना आणि 85 वर्षाहून अधिक मतदारांना गृह मतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली व तुमसर विधानसभाा मतदारसंघात दि.7 ते 9 नोव्हेंबर रोजी मतदारांनी गृह मतदान करत मतदानात हक्क बजावला. आयोगाच्या वतीने विधानसभेसाठी पहिल्यांदाच गृह मतदान हा उपक्रम घेण्यात आले त्यात भंडारा जिल्ह्यातील मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्ह्यात गृहमतदानासाठी नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब व सहायक नोडल अधिकारी मुख्याधिकारी भंडारा करणकुमार चव्हाण आहेत.
साकोली व तुमसर विधानसभेत गृहमतदान पुर्ण झाले असून भंडारा विधानसभेसाठी ही प्रक्रीया होत आहे. ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाची सुविधेचा लाभ घेता येईल, विधानसभेसाठीशीं सुविधा प्रथमच भारतीय निवडणूक आयोगद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच दिव्यांग बंधू भगिनींनी सुद्धा मतदानाचा हक्क नोंदवला. यावेळी गृह मतदान करताना आयोगाने दिलेले सूचनांचे पालन नियुक्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी केले तसेच गोपनीयतेने गृह मतदान करण्यात आले.
60-तुमसर मध्ये एकुण 436 मतदारांपैकी 416 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक 316 पैकी 304 मतदारांनी मतदान केले. 120 दिव्यांग मतदारांपैकी 112 जणांनी मतदान केले.
62-साकोली मतदारसंघात एकुण 434 मतदारापैकी 414 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक 306 पैकी 290 मतदारांनी मतदान केले. 128 दिव्यांग मतदारांपैकी 124 मतदारांनी मतदान केले.
61-भंडारा विधानसभा मतदार संघासाठी एकुण 505 मतदारांपैकी 449 झाले असून त्यामध्ये ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक 423 पैकी 377 मतदारांनी मतदान केले. 82 दिव्यांग मतदारांपैकी 72 मतदारांनी मतदान केले असून प्रक्रिया आजही सुरू आहे.



