गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रीय अनु. जाती-जनजाती विकास परिषदेच्या सिरोंचा तालुकाध्यक्षपदी सतीश भोगे

गडचिरोलीत पार पडली जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक ; समाज बांधवांची मोठी उपस्थिती

गडचिरोली : राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली (शाखा गडचिरोली) अंतर्गत नुकतीच जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सिरोंचा नगर पंचायतीचे कार्यतत्पर नगरसेवक सतीश भोगे यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार तथा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली.

गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात ही बैठक पार पडली. सतीश भोगे यांनी नगरसेवक म्हणून शहरात आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर तालुका पातळीवरील ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे सिरोंचा तालुक्यातील अनुसूचित जाती-जनजाती प्रवर्गातील प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आढावा बैठकीला संघटनेचे राज्य सचिव डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, ॲड. कविता मोहरकर, वासुदेवराव पोटवार, अशोक सुकदेवे, कुमार उंदीरवाडे आणि शुभम रामटेककर राजकुमार घोडेश्वर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय अनु. जाती-जनजाती परिषद), अमोल कुळमेथे (जिल्हा उपाध्यक्ष), मृण्मयी उंदीरवाडे (जिल्हा सचिव), शुभम वनकर (तालुकाध्यक्ष, गडचिरोली), बानय्या जनगाम (जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), सूरज गावडे (सरपंच, गर्कापेठा) यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतीश भोगे यांच्यावर आता सिरोंचा तालुक्याची संघटनात्मक जबाबदारी आल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. आगामी काळात संघटनेची व्याप्ती वाढवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी कार्य करणार असल्याचा मानस नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश भोगे यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button