गडचिरोलीविदर्भ

शॉर्टसर्किटमुळे घराला आग ; कुलरसह पलंग जळून खाक

रांगी येथील घटना ; घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान

गडचिरोली : रांगी येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका घरात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत घरातील कुलर, पलंग आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असून, घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रांगी येथील रहिवासी दामाजी बोरसरी यांच्या घरी दुपारी सर्व सदस्य असताना अचानक विद्युत उपकरणात शॉर्टसर्किट झाले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले, ज्यामध्ये घरातील लाकडी पलंग आणि नवीन कुलर पूर्णपणे जळून कोळसा झाले. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आगीत दामाजी बोरसरी यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button