गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा एसएससी परीक्षेत १०० टक्के निकाल ; कृष्णा आंबोरकर जिल्ह्यात तृतीय

सलग उज्ज्वल यशाची परंपरा कायम; ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत ६ विद्यार्थ्यांनी पटकाविली प्राविण्य श्रेणी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेत गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या नावाचा दरारा निर्माण केला आहे. विद्यालयाचा यंदाही १०० टक्के निकाल लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुणांसह यशाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयाचा कॅडेट मास्टर कृष्णा सोमेश्वर आंबोरकर याने ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, कृष्णाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

द्वितीय क्रमांक: कॅडेट मास्टर काव्य रविंद्र जुमनाके (९०.४० टक्के). तृतीय क्रमांक (संयुक्त): कॅडेट मास्टर विश्वजित राकेश साखलवार आणि नरेंद्र नितीन नखाते (प्रत्येकी ९०.२० टक्के). कॅडेट मास्टर परिमल गुरुदेव वडस्कर आणि नमन परशुराम गेडाम यांनी ९० टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.

विद्यालयातील निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच विद्यार्थी ७० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. ९०% पेक्षा जास्त गुण: ६ विद्यार्थी. ८०% पेक्षा जास्त गुण: ११ विद्यार्थी.७५% पेक्षा जास्त गुण: ८ विद्यार्थी.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम आणि संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे पालकवर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button