क्राईमगडचिरोलीविदर्भ

संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त; कृषी विभागाची रामसागरमध्ये धडक कारवाई

३७ संशयित पाकिटांसह सीलिंग मशीन जप्त ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

गडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर अनधिकृत बियाण्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाने मोहीम तीव्र केली आहे. चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे अवैधरित्या संशयित HTBT (Herbicide Tolerant) कापूस बियाण्यांची साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळताच, जिल्हास्तरीय भरारी पथकाने गुरुवारी (१४ मे) सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत बियाण्यांच्या पाकिटांसह पॅकिंगचे साहित्य असा एकूण ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कृषी विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रामसागर येथील संशयित ठिकाणावर छापा टाकला. या मोहिमेत संशयित कापूस बियाणे: पुष्पा, बलवान आणि मालामाल या नावांच्या वाणांची एकूण ३७ पाकिटे (किंमत ३३,९३७ रुपये). पॅकिंग साहित्य: बियाणे सील करण्यासाठी वापरले जाणारे सीलिंग मशीन (किंमत १,५०० रुपये) आणि कोरे पॅकेट्स. आढळून आले.

या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार (रा. रामसागर) याच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ यांसह विविध कडक कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. यामध्ये मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

या कारवाईसाठी संचालक सुनील बोरकर, विभागीय सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर आणि कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले. अनधिकृत बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने, अशा विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button