गडचिरोलीविदर्भ

व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व विभागांनी कृती करावी – तहसीलदार संतोष आष्टीकर यांचे निर्देश

गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात मुक्तीपथ तालुका समितीची बैठक तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्त शाळा, कार्यालय, अवैध दारू व सिंधी विक्री, दारू विक्रेत्यांकडून होणारी अवैध वृक्षतोड थांबविणे,  महिलांना खर्राच्या व्यसनांपासून दूर ठेवणे आदी मुद्द्यांवर चर्चा करून तालुक्यातील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत गडचिरोली तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय तंबाखू मुक्त करणे, तसेच प्रवेश व्दारावर आमचे कार्यालय शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय तंबाखू मुक्त असलेला बोर्ड लावणे, कोटपा कायद्या 2003 नुसार दंड आकारण्यात येईल असे फलक लावणे बंधनकारक आहे असे ठरविण्यात आले. शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महावि‌द्यालयच्या 100 मीटर परिसरात तंबाखू जण्य पदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणावर कोटपा कायद्या नुसार येथील अधिकारी, मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांनी कारवाई करावी असे ठरविण्यात आले. तंबाखू मुक्त शाळा निकष नुसार शाळा तंबाखू मुक्त असाव्या, BEO यांनी शाळेला पत्र पाठवून नोडल ऑफिसर मुख्यध्यापक यांनी कृती करण्यास सांगावे, BEO यांनी दर सहामाही मुख्यध्यापक यांच्या कडून अहवाल घ्यावे, असे ठरविण्यात आले. तसा अहवाल होणाऱ्या तालुका समिती बैठकीत सादर करावे असे ठरविण्यात आले.

शहर, गाव शासकीय/निमशासकीय कार्यालय, शाळेत येथील प्रमुखाने खर्रा तंबाखूजन्य पदार्थ ऑफिसच्या वेळेत सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोटपा कायद्या नुसार दंड करावे असे ठरविण्यात आले. नगर परिषद/पोलीस स्टेशन / राज्य उत्पादन शुल्क च्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी पानठेले, अंडा भुर्जी स्टॉल व इतर विक्री करण्याच्या नावाने दारु विक्री करतात. त्यांच्यावर कारवाई करून ते जप्त करावे तसा अहवाल मुक्तिपथ तालुका समिती अध्यक्षांकडे सादर करावा. तहसील कार्यालयाच्या बाजूला 200 मीटर अंतरावर धानोरा व पोटेगाव रोड येथील दारु विक्रेत्यावर पोलिसांनी वारंवार कारवाई करावी असे ठरविण्यात आले. गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी दारू व तंबाखूचे अवैध धंदे करणाऱ्याचे नावे पोलिस स्टेशन गडचिरोली, पोटेगाव, येथे द्यावे व तेथील संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर कारवाही केलेले अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करावे. गावातील/शहरातील शिंधी व ताडी विक्री करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत समितीची बैठक व कृती व्हावी यासाठी BDO यांनी ग्रामपंचायतला पत्र पाठवावे तसा सचिवाकडून अहवाल मागावे. तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून ANM, आशा वर्कर यांनी खरा तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांना सांगावे. गडचिरोली, पोर्ला, चातगाव, पोटेगाव या वनपरिक्षेत्रामध्ये मोह फुलाचे ड्रम मोठ्या प्रमाणात टाकून अवैध दारू काढण्यासाठी वृक्ष तोड करून दारू काढतात, त्यांच्यावर वन विभागाने कार्यवाही करावी. आदी विषयावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

यावेळी तहसीलदार संतोष आष्टीकर, एपीआय शरद मेश्राम, गट शिक्षण अधिकारी हेमलता परसा, नायब तहसीलदार चंदू प्रधान, तालुका आरोग्य कार्यालयाचे आर.डी. राऊत, जिल्हा दारुबंदी सदस्य विलास एन. निंबोळकर, शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. अमर कुरील, माविम व्यवस्थापक गीता एन. गुडी, संघटक रेवनाथ आर. मेश्राम, तालुका संघटक प्रकाश एस. फुलकंवर, तालुका प्रेरक मेघा एम. गोवर्धन, पल्लवी पेटकर, आर. जे. भैसारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button