
भंडारा : कारधाहून पवनीकडे जाणाऱ्या पालगाव पेट्रोल पंपासमोर शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी ५:५० वाजता दोन मोटारसायकलींची धडक झाली. यात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.
आकाश गोपीचंद पडोळे (२४, आंभोरा, ता. पवनी) हे दुचाकीने (एमएच ४० सीजी ६५०८) जात असताना मागून आलेल्या (एमएच ३६ एडी ५२५६) दुचाकीवरील अंकित श्रीराम मनगटे (२६, गणेशपूर, भंडारा) याने धडक दिली. अपघातात अंकित यांचा पाय मोडला. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.



