गडचिरोलीविदर्भ

‘सेवाकार्याने’ साजरा होणार माजी खा. डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस ; गडचिरोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेमाना देवस्थानात वृक्षारोपण, वृद्धाश्रमात मदत तर रुग्णांना होणार भोजन व फळ वाटप; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस बुधवार, १ जुलै रोजी नेहमीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आणि ‘सेवा भाव’ जपून साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली शहरात विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमांची रूपरेषा 

सकाळी ८:०० वाजता — एकत्रिकरण: गडचिरोली येथील चामोर्शी रोडवर असलेल्या डॉ. अशोक नेते यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक एकत्रित जमतील. सकाळी ९:०० वाजता — सेमाना दर्शन व वृक्षारोपण: गडचिरोलीचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थान येथे जाऊन दर्शन व विशेष पूजा-अर्चा केली जाईल. त्यानंतर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सेमाना परिसरात भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडेल. सकाळी १०:०० वाजता — वृद्धाश्रमात मदत व भेट: चामोर्शी रोडवरील वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येईल व त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले जातील. सकाळी ११:३० वाजता — रुग्णांना व नातेवाईकांना भोजन-फळ वाटप: गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत मोफत भोजन वाटप केले जाईल. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात येईल. सायंकाळी ६:०० वाजता — मुख्य अभिष्टचिंतन सोहळा: गडचिरोली-चामोर्शी हायवेवरील गोविंदपूर येथील ‘विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट (धाबा)’ येथे मुख्य वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होईल. या सोहळ्यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून डॉ. अशोक नेते यांना दीर्घायुष्याच्या व भावी राजकीय प्रवासाच्या शुभेच्छा देतील.

डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस हा केवळ एक कौटुंबिक किंवा राजकीय उत्सव नसून तो समाजसेवेचा एक दृढ संकल्प आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चाचे शिलेदार आणि विविध आघाड्यांच्या प्रमुखांनी सर्व कार्यक्रमांना वेळेवर व बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आग्रही आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button