चंद्रपूरविदर्भ

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नागभीड : तालुक्यातील नांदेड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लौकिक सुरेश कुंभरे (वय १९) असे मृतकाचे नाव आहे.

लौकिक कुंभरे हा ब्रह्मपुरी येथे बीएससी प्रथम वर्षात शिकत होता. शनिवारी तो घरातील स्वतःच्या खोलीत असताना, त्याने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. माहिती मिळताच तळोधी (बा.) पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची नागरिकांत चर्चा आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल गुहे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button