गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ‘महसूल जनकल्याण शिबिरांचे’ आयोजन ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

‘सेवा तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ; एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – आ. डॉ. परिणय फुके

गोंदिया : नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा तातडीने निपटारा करणे आणि विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत “महसूल जनकल्याण शिबिरांचे” आयोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’तर्गत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

या आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, ज्योती कांबळे, तहसीलदार समशेर पठाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव येथील शिबिराची तारीख बदलून २ ऑगस्ट करण्यात आली आहे. १ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील ‘जलाराम लॉन्स’ येथे पार पडेल. २ ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी येथील ‘आशीर्वाद हॉल’ येथे आयोजित केले जाईल.

या शिबिरांच्या माध्यमातून महसूल विषयक सेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत योजना, तसेच वनपट्टे व जमीन पट्टे वाटप यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी “सेवा तुमच्या दारी” या संकल्पनेतून ही शिबिरे राबवली जात आहेत.

बैठकीदरम्यान बोलताना आमदार डॉ. परिणय फुके यांनी पूर्व तपासणी व पात्रता पडताळणीवर भर देत “एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये” अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button