गडचिरोलीविदर्भ

91 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट ; दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

पोलिस, मुक्तिपथ व महिलांची संयुक्त कृती

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून ठिकठिकाणी मिळून आलेला 91 हजार 500 रुपयांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करीत दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कृती अहेरी पोलिस, मुक्तिपथ टीम व गावातील महिलांनी संयुक्तरीत्या केली.

अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागुलवाही येथे मुक्तिपथ तर्फे दोन दिवसीय सघन भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील प्रतिष्ठीत नागरिक व महिलांची बैठक घेऊन अवैध दारूविक्रीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली असता, ग्रामस्थानी विविध समस्या मांडल्या. दरम्यान अवैध दारूविक्री थांबविण्याचा निर्णय घेऊन सक्रीय महिलाना संघटित करण्यात आले. तसेच दारूविक्रत्यांविरोधात अहिंसक कृती करीत धडा शिकवण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, जंगल परिसरामध्ये मोहसडवा असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस विभागाच्या सहकार्याने मुक्तीपथ टीम व महिलांनी जंगल सवारी केली. यावेळी एका ठिकाणी जिवंत हातभट्टी मिळाली. परंतु, दारूविक्रते घटनास्थळावरून पसार झाले. कृती दरम्यान जंगल परिसरामध्ये विविध ठिकाणी 16 ड्रम मोह सडवा, चार स्टील गुंड व दारू काढण्याचे तिन स्टील मोठे गुंड असा जवळपास 91 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणाचा तपास करून  दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी, पोलीस हवालदार दादाराव सिडाम, पोलीस शिपाई विनोद आत्राम, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, प्रेरक तृप्ती मंडल, पल्लवी तूपसुंदर यांच्यासह गावातील 13 महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button