क्राईमगोंदियामुख्य बातमीविदर्भ

3.60 लाख रुपयांच्या गांज्यासह दोन आरोपींना अटक

देवरी पोलिसांची कारवाई

गोंदिया : रायपुरकडन नापुरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून देवरी पोलिसांनी 05 ऑक्टोबर  रोजी रात्री 8.30 वाजता दरम्याम शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासनी नाक्याजवळ बंदोबस्त लावत ओल्या गांज्याचे 24 पॉकेट जप्त केले. ज्यामुळे परराज्यातून गांजाची बिनबोभाट तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या कारवाईत देवरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या देवरी तालुक्यात चोऱ्या, दराेड्यांच्या घटनेवर काही प्रमानात आळा बसला असला तरी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शनिवारी रात्री देवरी पोलिसांना सुत्रानीं माहिती दिली की, रायपुर कडुन नागपुर कडे एका चारचाकी वाहनात गांजाची वाहतुक होत आहे. त्या आधारावर देवरी पोलिसांनी शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासनी नाक्यावर नाकेबंदी केली. प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते. दरम्यान रात्री 8.30 वाजताच्या सुमारास रायपुरमार्गे नागपुरकडे येत असलेली कार क्र. आरजे 08 टीए 1836 चालकाने नाकेबंदीदरम्यान जोरात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क झालेल्या पोलिसांपुढे त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेत गाडीची झडती घेतली. या वेळी गाडीच्या डिक्कीत गांजाची 24 पाकिटे आढळून आली. या पाकिटांत अंदाजे 120 किलो ओला गांजा आढळून आला. बाजारात याची किंमत 3 लाख 60 हजार रुपये आहे. गांजा, कार, मोबाइल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील व सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button