सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या भव्य रोड-शोने डॉ. मिलिंद नरोटे यांचे शक्तिप्रदर्शन
मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती

चामोर्शी व गडचिरोली शहरात काढण्यात आली रॅली
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या रोड-शोच्या माध्यमातून आपले शक्तिप्रदर्शन दाखविले. ही रॅली चामोर्शी व गडचिरोली शहरातून काढण्यात आली.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. गिता हिंगे, नगरसेविका रोशनी वरघंटे, भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ सुप्रसिध्दी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या भव्य रोड-शोची सुरुवात सर्वप्रथम चामोर्शी शहरातील भाजप प्रचार कार्यालयापासून लक्ष्मी गेट व वरवंटी चौक अशी करण्यात आली. त्यानंतर गडचिरोली शहरातील भाजपा प्रचार कार्यालयातून सई ताम्हणकर यांच्या भव्य रोड-शोला सुरुवात करुन शहरातील बेसिक शाळा, राम मंदिर, धानोरा रोड, भाजपा प्रचार कार्यालय व गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. भव्य रोड-शोच्या माध्यमातून सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांचा प्रचार केला.



