गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

28 रुग्णांनी घेतला तालुका क्लिनिकचा लाभ

गडचिरोली : दारूच्या व्यसनापासून त्रस्त झालेल्या रुग्णांना तालुकास्थळी उपचार मिळावे, यासाठी मुक्तीपथतर्फे तालुका क्लिनिक सुरू आहेत. या आठवड्यात चार तालुक्यातील 28 रुग्णांनी व्यसन उपचार घेतला आहे.

दारूच्या व्यसनी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी जिल्हाभरातील बाराही तालुक्यातील मुक्तीपथच्या तालुका कार्यालयात व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन व उपचार केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. या आठवड्यात आरमोरी 9, सिरोंचा 7, मूलचेरा 6, अहेरी 6 अशा एकूण 28 जणांनी तालुका क्लिनिकचा लाभ घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्णय घेतला. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना औषधोपचार व समुपदेशन देखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button